मराठी - "चांगले बातम्या".mp4

मराठी - "चांगले बातम्या".mp4

Marathi Language - "Good News".mp4 //योहान - अध्याय 1 1 जगाची उत्पत्ति होण्यापूर्वी शब्दअस्त...
54 Minuten
Podcast
Podcaster
INDIAN MOST POPULAR LANGUAGES BY NUMBER(FROM No.1 TO No.12) / ===“Good News for All People”, "Words of Light", and "Songs og Life" // संख्या से सर्वाधिक बोली जाने वाली भाषाओं (१-१२) भारत में - ==="सभी लोगों के लिए अच्छी खबर", "प्रकाश के शब्द", और "जीव...

Beschreibung

vor 9 Jahren

Marathi Language - "Good News".mp4 //


योहान - अध्याय 1


 1 जगाची उत्पत्ति होण्यापूर्वी
शब्दअस्तित्वात होता. तो शब्द देवाबरोबर होता. आणि शब्द देव
होता.
2 तो शब्द सुरूवातीपासूनच देवाबरोबर होता.
3 त्याच्याद्वारे (शब्दाच्या) सर्व काही निर्माण
करण्यात आले त्याच्याशिवाय काहीच निर्माण करण्यात आले नाही.
4 त्याच्यामध्ये जीवन होते. ते जीवन जगातील
लोकांसाठी प्रकाश (समजबुद्धी, चांगुलपण) असे होते.
5 हा प्रकाश अंधारात प्रकाशतो. पण त्या प्रकाशाला
अंधाराने पराभूतकेले नाही.
6 योहाननावाचा एक मनुष्य होता. देवाने त्याला
पाठवीले.
7 तो लोकांना प्रकाशाविषयी (ख्रिस्ताविषयी)
सांगण्यासाठी आला. यासाठी की, योहानाकडून प्रकाश विषयी ऐकून लोकांनी
विश्वास ठेवावा.
8 योहान तो प्रकाश नव्हता, परंतु लोकांना
प्रकाशाविषयी सांगण्यासाठी योहान आला.
9 खरा प्रकाश जगात येणार होता. हा प्रकाश सर्व
लोकांना प्रकाश देतो.
10 शब्द अगोदरच जगात होता. त्याच्याद्वारेच जग
निर्माण झाले. परंतु जगाने त्याला ओळखले नाही.
11 तो जगात आला, जे त्याचे स्वत:चे होते त्या
लोकांकडे आला, परंतु त्याच्या स्वत:च्याच लोकांनी त्याला आपले मानले
नाही.
12 काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी
त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने
देवाची मुले होण्याचा हक्क दिला.
13 ही मुले लहान बालके जन्मतात तशी जन्मली नाहीत.
त्यांचा जन्म आईवडिलांच्या इच्छेने किंवा योजनेमुळे झाला नाही, तर
त्यांचा जन्म देवाकडून झाला.
14 शब्द मनुष्य झाला आणि आमच्यामध्ये राहिला.
आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते देवपित्याच्या एकमेव अशा पुत्राचे
गौरव ख्रिस्ताशिवाय दुसरे असू शकत नाही. तो शब्द कृपा (दयाळूपणा)
आणि सत्य यांनी पूर्णपणे भरला होता.
15 योहानाने त्याच्याविषयी लोकांना सांगितले.
योहान म्हणाला, “ज्याच्याविषयी मी सांगत आहे तो हाच. मी म्हणालो,
माझ्यानंतर येणारा माझ्याहून थोर आहे, तो मोझ्या अगोदरपासुन
आहे.”
16 शब्द (ख्रिस्त) हा कृपा (दयाळूपणा) व सत्य
यांनी पूर्णपणे भरला होता. त्याच्याकडून आम्हांला भरपूर आशीर्वाद
मिळाले.
17 मोशेद्वारे नियमशास्त्र दिले, पण दया व सत्याचा
मार्ग ही येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त झाली.
18 कोणाही मनुष्याने आतापर्यत देवाला कधी पाहिले
नाही. परंतु एकमेव देव (येशू) जो बापाच्या उराशी आहे, तो
पुत्राद्वारे आम्हांला प्रकट झाला आहे.

Kommentare (0)

Lade Inhalte...

Abonnenten

15
15